Join us  

ठाणे पोलीस घेणार नईमचा ताबा, मुंबई पोलिसांचा १९९३ स्फोटाच्या दृष्टीने तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:38 AM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका हस्तकाच्या मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी खबऱ्यांनाही नव्याने कामाला लावले आहे.

ठाणे  - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका हस्तकाच्या मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी खबऱ्यांनाही नव्याने कामाला लावले आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील हा शस्त्रसाठा असल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीनेही मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नईम खानला ठाण्याचे खंडणीविरोधी पथक ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सोमवारी न्यायालयामार्फत त्याला ताब्यात घेणार आहेत.नईम खानच्या घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त केलेल्या साठ्यामध्ये एके-५६ सारख्या रायफलचाही समावेश असून १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांदरम्यान पाकिस्तानातून आलेल्या साठ्यातीलही शस्त्रे असावीत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. १ आॅक्टोबर १९९७ च्या एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये गुंडाळून ठेवलेली ही शस्त्रे छोटा शकीलने पाठविली होती. कोकेनच्या तस्करीप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने ५ जुलै रोजी मुंबईतील नागपाडा येथील जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ यांना अटक केली होती. त्यांच्याच चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरेगावातील बांगुरनगरच्या क्रांती चाळीत छापा टाकून खान याच्या घरातून ही शस्त्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने जप्त केली.पोलिसांनी या प्रकरणी नईम खानची पत्नी यास्मिन हिला अटक केली. ही शस्त्रे कोठून आणली गेली? ती कोणाला पाठवायची होती? अशा कोणत्याच प्रश्नांची उत्तरे यास्मिनने पोलिसांना दिली नाही. आपल्या लग्नाच्या आधीपासूनच (१९९७च्या आधी) एके-५६ रायफल, तीन मॅगझिन्स, १०८ जिवंत काडतुसे आणि दोन पिस्टल ही शस्त्रसामग्री घरात दडविली होती. इतकीच माहिती असल्याचे तिने सांगितले.छोटा शकीलच्याच सांगण्यावरून मायकल जॉन डिसुझा उर्फ राजू पिल्ले, नईम खान आणि नितीन गुरव या तिघांनी इक्बाल अत्तरवाला याच्या खुनासाठी शस्त्रसामग्रीसह जोगेश्वरी येथे जमले होते. रफीकअली सय्यद उर्फ सीडी यानेही या तिघांना मदत केली होती. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी या चौघांना २० एप्रिल २०१६ रोजी अटक केली होती. तर, छोटा शकील उर्फ शकील बाबू शेख, अन्वर शेख, रझाक बलोच, रियाज मेमन आणि तबरेज आलम हे या खून प्रकरणात वाँटेड आहेत.नईम खानच्या घरात वरील शस्त्रसाठा मिळाल्यामुळे ठाण्याचे खंडणीविरोधी पथक त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सोमवारी न्यायालयामार्फतीने ताब्यात घेतील. त्याच्या चौकशीतूनच या प्रकरणातील आणखी महत्त्वपूर्ण माहिती पुढे येऊ शकते, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.पोलिसांकडूनही चौकशीखानच्या घरातून १९९३ च्या बॉम्बस्फोटांतील शस्त्रसाठा मिळाल्याने मुंबई पोलिसांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. आणखी असा शस्त्रसाठा कुठे दडविण्यात आला आहे किंवा कसे, याबाबतचा तपास आता मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.नायजेरियन पसार-कोकेनची तस्करी करणाºया जाहीर काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ या दोघांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने ५ जुलै रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच ग्रॅम असे ५० हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.- त्यांनी ज्या नायजेरियनकडून कोकेनची खरेदी केली, त्याचा शोध वाशी परिसरात घेण्यात आला. मात्र, या दोघांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर तो पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :पोलिसबातम्या