ठाण मांडलेले पोलीस अधिकारी मुंबईबाहेर

By Admin | Updated: January 6, 2015 02:45 IST2015-01-06T02:45:27+5:302015-01-06T02:45:27+5:30

राज्य शासन पोलिसांसाठीच्या बदली नियमात काही सुधारणा करत असून मुंबईत दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली मुंबईसोडून राज्यात अन्यत्र कुठेही होऊ शकते.

Thane police station outside Mumbai | ठाण मांडलेले पोलीस अधिकारी मुंबईबाहेर

ठाण मांडलेले पोलीस अधिकारी मुंबईबाहेर

बदली नियमात सुधारणा : पोलीस शिपायाची बदली पाच वर्षांनी!
यदु जोशी - मुंबई
राज्य शासन पोलिसांसाठीच्या बदली नियमात काही सुधारणा करत असून मुंबईत दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली मुंबईसोडून राज्यात अन्यत्र कुठेही होऊ शकते.
पोलीसांच्या बदली नियमात फेरदुरूस्ती करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक ८ जानेवारीला होणार असून त्यात विविध बदलांवर शिक्कामोर्तब केले जाईल. मुंबईत दहा वर्षांहून अधिक काळ नोकरी केलेल्या बिगर आयएएस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची राज्यात अन्य ठिकाणी बदली केली जाऊ शकते.
मुंबईतील पोलिस अधिकारी अनेकदा राजकीय हितसंबंध वापरून राज्याच्या इतर भागात झालेली बदली रद्द करून घेतात. त्यासाठी प्रसंगी पदोन्नतीही नाकारली जाते. वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी सहाय्यक आयुक्ताची पदोन्नती केवळ मुंबईबाहेर बदली होत असल्याने नाकारल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आघाडी सरकारने गेल्यावर्षी बदल्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पोलीस आस्थापना मंडळांची स्थापना केली होती. त्यावेळी बदली अधिकारांचे मंत्रालयातून अधिकाऱ्यांकडे विकेंद्रीकरण झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पण प्रत्यक्षात बदल्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप कायम राहिला होता.

च्पोलीस दलात एका वर्षात जास्तीत जास्त ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असा नवीन नियमदेखील येऊ घातला आहे.
च्पोलीस दलाला स्थैर्य प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल्या करु नयेत, ही या मागील भूमिका आहे.
पोलीस शिपायांना
पाच वर्ष
च्पोलीस शिपायाची बदली एका ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी दर दोन वर्षांनी करावी असा सध्याचा नियम आहे. पूर्वी हा काळ तीन वर्षांचा होता. आघाडी सरकारच्या काळात तो दोन वर्षांचा केला होता.
च्सूत्रांनी सांगितले की पोलीस शिपायासारख्या खालच्या कर्मचाऱ्याला आपले बिऱ्हाड वारंवार हलविण्याचा त्रास होऊ नये म्हणून ही मुदत आता पाच वर्षे करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार आहे.

Web Title: Thane police station outside Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.