ठाणे, पालघर जि.प.ची निवडणूक लवकरच !
By Admin | Updated: December 25, 2014 00:08 IST2014-12-25T00:08:46+5:302014-12-25T00:08:46+5:30
जिल्हा विभाजनामुळे बरखास्त करण्यात आलेली ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे आता ठाणेसह

ठाणे, पालघर जि.प.ची निवडणूक लवकरच !
ठाणे : जिल्हा विभाजनामुळे बरखास्त करण्यात आलेली ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे आता ठाणेसह नूतन पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणूक घेणे आवश्यक आहे. यासाठी लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
आॅगस्टपासून बरखास्त झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेसह नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यांच्या कालावधीत घेणे आवश्यक आहे. सुमारे चार महिन्यांचा कालावधी संपण्यात आला आहे. याशिवाय आचारसंहितेचा कालावधी त्यात जाणार आहे. यामुळे ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.