ठाणे, पालघर : २०३९ विहिरी अपूर्ण
By Admin | Updated: December 29, 2014 00:12 IST2014-12-29T00:12:21+5:302014-12-29T00:12:21+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराचे विविध उपक्र म ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत राबविण्यात येत आहेत

ठाणे, पालघर : २०३९ विहिरी अपूर्ण
पंकज रोडेकर, ठाणे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराचे विविध उपक्र म ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत राबविण्यात येत आहेत. त्यानुसार, या दोन्ही जिल्ह्यांत विहिरी बांधण्याच्या चार हजार ६३५ कामांना मंजूरी देण्यात आली असून दोन हजार ५९६ कामे सुरू झाली आहेत. दोन हजार ३९ कामे अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये पालघर जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार २०७ विहिरींच्या कामांना मंजूरी मिळाली असून एक हजार ३५२ कामे अपूर्ण आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत रोजगाराचे विविध उपक्र म हाती घेतले जात आहेत. त्यातच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत सिंचन विहिरी बांधण्याच्या कामांना मंजूरी दिलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांत एकूण एक हजार ६२६ सिंचन विहिरी बांधण्याच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यातील ६८७ विहिरींची कामे अपूर्ण असल्याचे एमआयएस नोंदीवरून सांगण्यात आले आहे.