ठाणो-कल्याण प्रवासाला मेगाब्लॉकचा ‘ब्रेक’
By Admin | Updated: September 20, 2014 02:37 IST2014-09-20T02:37:47+5:302014-09-20T02:37:47+5:30
मध्य रेल्वेच्या ठाणो-कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणो-कल्याण प्रवासाला मेगाब्लॉकचा ‘ब्रेक’
ठाणो : मध्य रेल्वेच्या ठाणो-कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 3.3क् या वेळेत आहे.
या कालावधीत मुलुंडर्पयत आलेल्या धीम्या डाऊन मार्गावरील लोकल ठाण्यानंतर जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी या कालावधीत कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. या ठिकाणच्या प्रवाशांनी डाऊनमार्गे कल्याण-डोंबिवलीला येऊन त्यानंतर अपमार्गे अपेक्षित ठिकाणी जावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हार्बर मार्गावरील नेरूळ- मानखुर्द मार्गावर अप/डाऊन दिशांवर ब्लॉक असल्याने स. 11 ते 3 या कालावधीत सीएसटी ते बेलापूर/वाशी/पनवेल या ठिकाणी अप/डाऊन दोन्ही दिशांवर लोकल रद्द केल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी-मानखुर्द तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणो-पनवेल या दोन्ही मार्गावर अप/डाऊन दिशांवर विशेष लोकल धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवासाची मुभा असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
च्रेल्व रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली-गोरेगाव या स्थानकांदरम्यान अप/डाऊनच्या जलद मार्गावर पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
च्हा ब्लॉक स. 1क्.35 ते दु. 3.35 या कालावधीत असून, या काळात या मार्गाच्या लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.