ठाणो पूर्व ते साकेत जलवाहतूक
By Admin | Updated: August 9, 2014 00:07 IST2014-08-09T00:07:24+5:302014-08-09T00:07:24+5:30
ठाण्यातील जलवाहतुकीचा पहिला टप्पा ठाणो पूर्व ते साकेत असा असणार आहे. ठाणो महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

ठाणो पूर्व ते साकेत जलवाहतूक
सातारा : उतारवयात रक्ताने नाकारल्यास जायचे कोठे, हा प्रश्न अनेकांनाच पडत असतो. अशाच ज्येष्ठ मंडळींना आपलेसे करण्याचे काम येथील आनंदाश्रमने केले. पिकलेल्या पानाची काळजी घेण्याचे व्रत अंगीकारलेल्या आनंदाश्रम वृद्धाश्रमाला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. आई-वडिलांना उतार वयात सांभाळणे ही बहुतेक मुले व सुनांच्या बाबतीत नको असलेली बाब असते. काहीजण प्रेमाने सांभाळतात. तर काहीजण आपले नातेवाईक अथवा समाज काय म्हणेल म्हणून सांभाळतात; पण समाजात असेही काही लोक आहेत की, ते आई-वडिलांना सोडून देतात. अशांसाठी गरज असते ती वृद्धांश्रमांची.
ही गरज लक्ष घेऊन २१ वर्षांपूर्वी सातारा शहरात डॉ. सुभाष दांडेकर व नानासाहेब द्रविड यांनी पुढाकार घेऊन समविचारी व्यक्तींच्या मदतीने आनंदश्रम वृद्धाश्रम सुरू केला. आनंदाश्रम ही धर्मादाय संस्था असून, त्याचे दरवर्षी हिशोब तपासून घेण्याचे बंधन पाळत आला आहे. केवळ एका व्यक्तीवर सुरू केलेल्या आनंदाश्रमात सध्या ५० वृद्ध स्त्री-पुरुष आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींमुळे या कार्याला मोलाचा हातभार लागत आहे. याला पहिले अध्यक्ष दिवंगत अभयसिंह महाराज यांचाही नेहमीच पाठिंबा राहिला आहे.या ठिकाणी अत्यंत कमी शुल्कात चहा, नास्टा, जेवण राहण्याची सोय केली जाते. आठवड्यात चार ते पाच वेळा विनामूल्य आरोग्य तपासणी केली जाते. प्रसंगी औषधेही पुरविले जाते, गंभीर आजार असल्यास डॉ. अनंत साठे व डॉ. अशोक गोंधळेकर उपचार करतात.
वृद्धांची गरज लक्षात घेऊन याठिकाणी लिफ्टचीही सोय करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
येथील दिवंगत किशोरचंद्र नारायण बापट यांचे सातारा शहरात चांगले स्मारक व्हावे, यासाठी आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस व जनकल्याण समिती या दोघांचीही इच्छा असल्याने जनकल्याण समितीचे सध्याचे कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी आनंदाश्रम या समाजोपयोगी संस्थेस दहा लाखांची देणगी कै. बापट यांच्या चॅरिटेबल ट्रस्टमधून मंजूर केले आहेत. याची जाणीव ठेवून सभागृहास कै. सुमती व कै. किशोरचंद्र नारायण बापट सभागृह’ असे नाव दिले आहे. शनिवार, दि. ९ रोजी होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक लाखाचा पहिला धनादेश अध्यक्ष डॉ. सुभाष दांडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.