‘ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग १० महिन्यांत सुरू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:03 AM2018-06-19T07:03:57+5:302018-06-19T07:03:57+5:30

रेल्वे प्रकल्पांची मुंबईत वेगाने कामे सुरू आहेत. ठाणे-दिवा व कुर्ला-परळ या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम डेडलाइनमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी सांगितले.

'Thane-Diva fifth-sixth route starts in 10 months' | ‘ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग १० महिन्यांत सुरू’

‘ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग १० महिन्यांत सुरू’

Next

मुंबई : रेल्वे प्रकल्पांची मुंबईत वेगाने कामे सुरू आहेत. ठाणे-दिवा व कुर्ला-परळ या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम डेडलाइनमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी सांगितले. यानुसार ठाणे-दिवा हा पाचवा-सहावा मार्ग मार्च २०१९ अखेर कार्यान्वित करण्यात येईल.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांच्या सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लोहाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी लोहाणी बोलत होते. ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेमुळे मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यात येईल. लोकल सेवेलादेखील याचा फायदा होईल. ‘मिशन रफ्तार’नुसार ट्रेनचा वेग ५० टक्क्यांनी व मालगाडीचा वेग दुप्पट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वे बोर्डाच्या मंजुरीमुळे खोळंबलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन त्वरित मंजुरी मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही लोहाणी यांनी सांगितले.
>आढावा बैठकीत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ आणि ३अ साठी निधीच्या उभारणीबाबत चर्चा करण्यात आली. महामंडळाच्या एकत्रित सुरू असलेल्या प्रकल्पांच्या गतीवर लोहाणी यांनी समाधान व्यक्त केल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 'Thane-Diva fifth-sixth route starts in 10 months'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल