दर बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद
By Admin | Updated: May 12, 2014 22:57 IST2014-05-12T21:09:19+5:302014-05-12T22:57:04+5:30
उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून १५ जून पर्यंत होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे.

दर बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद
ठाणे - उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून १५ जून पर्यंत होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत ठाणे शहर पाचपाखाडी, चरई, नौपाडा, सिध्देश्वर, उथळसर, महागिरी, वृदांवन, श्रीरंग, ऋुतुपार्क, कळवा, खारेगांव, रेतीबंदर व मुंब्य्रातील काही भागांचा पाणीपुरवठा १४ मे २०१४ पासून प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार असून, नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पाणीपुरवठा विभागा केले आहे.