बच्चे कंपनीसाठी ठाण्यात किलबिल वाचनालय
By Admin | Updated: December 18, 2014 23:58 IST2014-12-18T23:58:30+5:302014-12-18T23:58:30+5:30
ठाणेकर नागरीकांसाठी किंबहुना जेष्ठ नागरीकांसाठी शहरात ठिकठिकाणी वाचनालये आहेत. परंतु, आता ठाण्यात पहिले किलबिल वाचनालय सुरु होत आहे.

बच्चे कंपनीसाठी ठाण्यात किलबिल वाचनालय
ठाणे - ठाणेकर नागरीकांसाठी किंबहुना जेष्ठ नागरीकांसाठी शहरात ठिकठिकाणी वाचनालये आहेत. परंतु, आता ठाण्यात पहिले किलबिल वाचनालय सुरु होत आहे. केवळ बच्चेकंपनीसाठी असलेल्या या वाचनालयात छोटा भीम पासून ते मोटु पतुलांच्या छायाचित्रांबरोबर मौजमजा तर करता येणार आहेच, शिवाय चांदोमामा सारख्या गोष्टींच्या पुस्तकांचा आस्वादही मुलांना घ्यायला मिळणार आहे.
या किलबील वाचनालयाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बच्चे कंपनीच्या हस्ते होणार आाहे. पाचपाखाडी भागातील महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या कचराळी तलाव परिसरात हे वाचनालय सुरु होत आहे. महापालिका आणि नगरसेवक निधीतून हे वाचनालय साकारले आहे. या वाचानलयात चांदोमामाच्या गोष्टीच्या पुस्तकासह, मराठी इंग्रजी या भाषांतील भाषेतील बच्चे कंपनीसाठी असलेली सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असणार आहेत.
तसेच या वाचनालयाच्या बाहेरील बाजूस बच्चे कंपनीसाठी खेळण्यासाठी जागा देखील उपलब्ध करुन दिली आहे. तसेच बच्चे कंपनीला येथे रममाण होता यावे यासाठी छोटा भीमसह, मोटु पतुल्यासारख्या कार्टुन्स देखील येथील भिंतीवर काढली जाणार
आहेत.
आजच्या आधुनिक जगात लहान मुले वाचनापासून दूर जात आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, तज्ञांच्या सल्याने लहान मुलांना वाचनाची सवय लागावी म्हणून वाचनालय सुरु करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)