ठाण्यातून १३६९ वाहने चोरीला
By Admin | Updated: December 7, 2014 23:28 IST2014-12-07T23:28:22+5:302014-12-07T23:28:22+5:30
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते.

ठाण्यातून १३६९ वाहने चोरीला
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. २०१४ च्या गेल्या १० महिन्यांत एक हजार ३६९ विविध प्रकारची वाहने चोरीला गेल्याने दिवसाला पाच वाहने चोरीला जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.यामध्ये सुमारे एक हजार ८२ दुचाकींचा समावेश असल्याने चोरट्यांचा दुचाकींवर डोळाअसल्याचे दिसते.वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना कल्याण आणि भिवंडी या दोन परिमंडळांत घडल्या. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये कल्याणातील महात्मा फु ले पोलीस ठाण्याच्या क्षेत्राचा पहिला क्रमांक लागत असून येथून ११९ दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
ठाणे शहर परिमंडळातून १९० दुचाकी, २९ थ्री व्हीलर आणि ३६ चारचाकी अशी एकूण २५५ वाहने चोरीला गेली असून मुंब्य्रातून ७७ दुचाकी, १३ थ्री व्हीलर आणि १० चारचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ कळव्यातून वाहने चोरीला गेली आहेत.भिवंडी परिमंडळात ३१५ वाहने चोरली असून २४८ दुचाकी,२७ रिक्षा आणि ४० चारचाकी वाहने गेली आहेत.नारपोली पोलीस ठाण्यातून सर्वाधिक वाहने चोरली आहेत. सर्वाधिक वाहने चोरीला जाणाऱ्या कल्याण परिमंडळातून ३१९ वाहने चोरट्यांनी लांबवली असून२७२ दुचाकी,२१ तीनचाकी तर २६ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.या परिमंडळातील म.फुले चौकी पोलीस ठाणे क्रमांक एकला आहे.उल्हासनगर परिमंडळातून २८९ वाहने चोरीला गेली असून २४६ दुचाकी, १८ तीनचाकी तर २५ चारचाकी वाहने चोरण्यातआली. वागळे इस्टेट परिमंडळातून १९१ वाहने चोरीला गेली असून १२६ दुचाकी,२३ तीनचाकी तसेच ४२ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.अशाप्रकारे एकहजार ८२ दुचाकी, ११८ तीन आणि १६९ चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत.लाखोंचा खर्च करून गाडी खरेदी करताना वाहनचालक वाहनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच चालकांनी वाहन उभे करताना हॅण्डल लॉक, आॅटो कॉप, जीपीएस सिस्टीम आदींचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार होत आहे.