Join us

मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीवर मोर्चा; उद्धवसेनेचा दणका, व्यवस्थापन वठणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 09:24 IST

नवीन मुलीच्या हातून अनवधानाने झालेली चूक लगेच सुधारण्याचे आश्वासनही पदाधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरी (पूर्व) मरोळ नाका येथील आर्या गोल्ड कंपनीने मराठी माणसाला नोकरीवर घेवू नये, अशा स्वरूपाची जाहिरात दिल्याने उद्धवसेनेने गुरूवारी कंपनी व्यवस्थापनाला दणका दिला. पक्षाचे विधानसभा संघटक प्रमोद सावंत आणि इतर शिवसैनिकांनी यांनी थेट कंपनीवर मोर्चा नेत जाहिरात मागे घ्यायला लावली. याप्रकरणी कंपनीने माफी मागण्याचेही मान्य केले.

यावेळी शाखाप्रमुख राजू माने, शाखाप्रमुख बिपिन शिंदे, उपशाखाप्रमुख भगवान तिर्लोटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कंपनीने नोकरी विषयक दिलेल्या जाहिरातीत मराठी उमेदवारास नकार दिला होता. याबाबत प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र व मुंबईतील मराठी माणसासाठी हा दुजाभाव असून आपल्या आस्थापनात संपूर्ण मराठी उमेदवारांचीच भरती झाली पाहिजे, असे सांगितले. याप्रकरणी आर्या गोल्ड कंपनीने जाहिर माफी मागत नोकरी पोर्टलवर ऑनलाईन जाहिरात देताना नवीन मुलीच्या हातून अनवधानाने झालेली चूक लगेच सुधारण्याचे आश्वासनही पदाधिकाऱ्यांना दिले.

 

टॅग्स :मुंबई