चांदीवलीत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांचा शिंदे गटात प्रवेश
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 2, 2023 15:53 IST2023-06-02T15:53:40+5:302023-06-02T15:53:52+5:30
आगामी महापौर भाजपाचाच असेल आणि मुंबईतून 150 नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी केली आहे.

चांदीवलीत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई- चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५६ च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
यावेळी त्यांच्यासह उपविभागप्रमुख अशोक माटेकर, शाखाप्रमुख नितीन चव्हाण यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी महापौर भाजपाचाच असेल आणि मुंबईतून 150 नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी केली आहे.आगामी महापालिकेची निवडणूक ही शिंदे गटासाठी आतित्वाची निवडणूक आहे.त्यामुळे ठाकरे गटाचे जास्तीत जास्त माजी नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठीआणि शिंदे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे हे महत्त्वाचं आहे.
यावेळी त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चांदीवली विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रश्न नक्की तडीस लावू असे सांगून यावेळी आशवस्त केले.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाठ, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर हे देखील उपस्थित होते.