टेट्रापॅकचा होणार पुनर्वापर
By Admin | Updated: February 16, 2017 02:24 IST2017-02-16T02:24:36+5:302017-02-16T02:24:36+5:30
वापरलेल्या कार्टन्सचा पुनर्वापर, प्रसार करण्याच्या हेतूने ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम

टेट्रापॅकचा होणार पुनर्वापर
मुंबई : वापरलेल्या कार्टन्सचा पुनर्वापर, प्रसार करण्याच्या हेतूने ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम म्हणजे ‘गो ग्रीन विथ टेट्रापॅक’ या बहुशहरी उपक्रमाचा हा एक भाग असून याचा पहिला टप्पा मुंबईपासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, मुंबईचे डबेवाले याची जनजागृती करणार आहेत.
मुंबईकरांपर्यंत हा उपक्रम अधिक सक्षमपणे पोहोचवण्यासाठी डबेवाला असोसिएशनबरोबर करार करून त्यांनाही या मोहिमेचा भाग केले आहे. मुंबईकरांना आता लवकरच एक विशेष संदेश त्यांच्या दारात त्यांच्या डब्याबरोबर मिळणार असून यामुळे त्यांना टेट्रापॅक कार्टन्सचा पुनर्वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. प्रत्येक घरी डबेवाल्यांच्या माध्यमातून पुनर्वापराचा संदेश प्रसारित करणार आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरही स्वच्छ राहील आणि शहरांतील शेकडो मुलांना चांगल्या सुविधाही मिळतील, असे डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन सावंत यांनी सांगितले.
सहा आठवडे चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे टेट्रापॅककडे १ लाख कार्टन्स गोळा होऊन त्याचा पुनर्वापर होण्याची अपेक्षा असून यापासून गरीब शाळांना बाके देण्याची योजना या मोहिमेतून आखण्यात आली आहे. पुनर्वापर करण्यात आलेल्या कार्टन्सपासून तयार केलेल्या खोक्यांमध्ये ४२ विविध
ठिकाणांहून टेट्रापॅक जमा
करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची घोषणा बुधवारी करण्यात आली, याप्रसंगी नगर विकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, आरयूआरच्या संस्थापिका
मोनिषा नरके आणि टेट्रापॅकच्या साऊथ एशिया मार्केट्सचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर जयदीप गोखले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)