Join us  

पंधरवड्यात चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी झाली घट, ऑक्टोबरची आकडेवारी राज्यात पॉझिटिव्ह रुग्णदर कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 9:57 AM

राज्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ११ लाख ५२ हजारांवर होते, तर ५ ते १८ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ९ लाख ७ हजारांवर आले आहे.

मुंबई : राज्यात मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. परिणामी , महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा दर कायम असला तरी दुसऱ्या बाजूला बातम्यांचे प्रमाण कमी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरच्या पंधरवड्यात चाचण्यांचे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी झाले आहे.

राज्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ११ लाख ५२ हजारांवर होते, तर ५ ते १८ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ९ लाख ७ हजारांवर आले आहे. यामुळे दैनंदिन चाचण्यांच्या प्रमाणावरही परिणाम झाला असून याचे प्रमाण ९१ हजारांवरून ७५ हजारांवर आले आहे. याच काळात राज्यात कोरोनाबाधितांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १४.६ टक्के असल्याची नोंद झाली आहे. मागील १०४ दिवसांत राज्यात रुग्णांचा दानाचा आलेख घसरला असून १८ ऑक्टोबर रोजी ४६ हजार ३१२ चाचण्या झाल्या असून यात ५ हजार ९८४ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

- राज्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ११ लाख ५२ हजारांवरून होते , तर ५ ते १८ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ९ लाख ७ हजारांवर आले आहे.

- दैनंदिन चाचण्यांच्या प्रमाणावर ही परिणाम झाला असून याचे प्रमाण ९१ हजारांवरून ७५ हजारांवर आले आहे.  

- मागील १०४ दिवसांत राज्यात रुग्णांनी दानाचा आलेख घसरला आहे.

- राज्यात चाचण्यांचे प्रमाण ९ ते १० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. रुग्ण निदानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने चाचण्यांचा प्रमाणही घटले.

सध्या कोरोनाचे एकूण रुग्ण - १६,२५,१९७  

उपचार होऊन घरे परतलेले - १४,३१,८५६

उपचार सुरू असलेले - १,५०,०११

होमआयसोलेशनमध्ये - २४,५९,४३६

कोरोनाचे बळी किती? - ४२,८३१

 सप्टेंबर अखेरीपासून ते  १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात रुग्णांची संख्या दीड लाखांनी कमी झाली आहे. याखेरीज पालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये फिव्हर क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटत असल्याचे निरीक्षण दिसून आले आहे.    - डॉ. प्रदीप आवटे, राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई