Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दहशत! गोरेगावच्या न्यू दिंडोशीतील गिरीकुंज सोसायटीच्या आवारात मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:23 IST

Leopard Spotted in Mumbai: संभाव्य हल्ले रोखण्याची स्थानिकांची मागणी, या मुक्त संचारामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण असल्याने वनखाते काय उपाययोजना करणार याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई-आता मुंबईतही बिबट्याची दहशत दिसत असून न्यू दिंडीशी गोरेगाव (पूर्व) भागात बिबट्याचा संचार पुन्हा सुरू झाला आहे. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनी येथील गिरीकुंज सोसायटी,इमारत क्रमांक ५ सीच्या संरक्षक भिंतीच्या मागच्या भिंतीवर आज पहाटे सुमारे २.३०च्या सुमारास बिबट्याचा थरार येथील रहिवासी रागिणी मानेकर यांनी आपल्या कॅमेरात टिपला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आमच्या सोसायटीच्या मागच्या बाजूस बिबटयाचा वावर पाहायला मिळत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.त्यामुळे संभाव्य बिबट्याचे हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी येथील रहिवासी डॉ.रामेश्वरी पाटील यांनी उद्धव सेनेचे नेते,स्थानिक आमदार सुनील प्रभू यांना केली आहे. यापूर्वी २०२० -२०२१ मध्ये येथे बिबट्याचा मुक्त संचार होता अशी माहिती त्यांनी दिली.

तर दि,२३ नोव्हेबर २०२५ मध्ये येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल बंगल्यात येथील ६ फूट उंचीच्या दि,२६ मे २०२५ मध्ये बसवलेल्या संरक्षक जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये आल्याने येथील नागरिकांची तर झोप उडाली होती.आमदार प्रभू यांनी याची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून त्यांना संभाव्य बिबट्याचे हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण असल्याने वनखाते काय उपाययोजना करणार याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard terrorizes Goregaon society, residents fear for safety.

Web Summary : A leopard was spotted in the Girikunj Society in Goregaon, Mumbai, causing panic among residents. Earlier incidents and calls for preventative measures have been made to authorities. Locals are worried about potential attacks and demand immediate action from the forest department.
टॅग्स :बिबट्याव्हायरल व्हिडिओप्राणी