मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:05 IST2021-01-01T04:05:07+5:302021-01-01T04:05:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत खाणिवडे ब्रिजवर भरधाव ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत खाणिवडे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेटचालकाचे नियंत्रण सुटल्याने, बुलेट स्लिप होऊन माहामार्गावर पडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला असून राजेश बजरंगी सिंह असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नालासोपाऱ्यातील राहणारा आहे. तर, मूनशी माजी असे जखमी तरुणाचे नाव असून तो वसई कामन, चिंचोटी सागपाडा येथील रहिवासी आहे. अपघातानंतर तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने दोघांना बावखळ येथील हायवे रुग्णालयात नेण्यात आले. जखमी तरुणावर उपचार सुरू केले आहेत, तर मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.