चेंबूरमध्ये रिपाइं-काँग्रेसमध्ये तणाव

By Admin | Updated: October 16, 2014 01:23 IST2014-10-16T01:23:14+5:302014-10-16T01:23:14+5:30

रिपाइंचे चेंबूरमधील उमेदवार दीपक निकाळजे यांनी काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्यावर व्होटिंग मशिनमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली.

Tension in Raipur-Congress in Chembur | चेंबूरमध्ये रिपाइं-काँग्रेसमध्ये तणाव

चेंबूरमध्ये रिपाइं-काँग्रेसमध्ये तणाव

मुंबई : रिपाइंचे चेंबूरमधील उमेदवार दीपक निकाळजे यांनी काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्यावर व्होटिंग मशिनमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. यावरून चेंबूर, पी. एल. लोखंडे मार्गावरील पालिका शाळेतील मतदान केंद्राबाहेर रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते.
हे मतदान केंद्र हंडोरे यांच्या घराजवळ आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास हंडोरे या मतदान केंद्राबाहेर आढळले. त्यावरून निकाळजे आणि आरपीआय कार्यकर्तेही तेथे धडकले. हंडोरे यांनी मतदानाची मुदत संपल्यानंतर व्होटिंग मशिनमध्ये फेरफार केल्याचा आरोप निकाळजे यांनी केला. इतक्यावरच न थांबता हंडोरे २००४ व २००९ची निवडणूक मशिनमध्ये फेरफार करूनच जिंकले, असाही दावा त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ते अडून बसले. हळूहळू येथे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमू लागले. रिपाइंने हंडोरे, निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही नारेबाजी सुरू केली. येथील तणावपूर्ण परिस्थिती पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निकाळजे, हंडोरे यांची समजूत घालून जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, हंडोरे यांनी मी मतदान केंद्रात गेलोच नाही, असे सांगितले. सहाच्या सुमारास या केंद्राबाहेर मतदारांची बरीच गर्दी खोळंबलेली दिसत होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेत काही अडथळा निर्माण झाला आहे का, अशी विचारणा मी अधिकाऱ्यांना फोनवरून केली. हा फोन मी केंद्राबाहेरून केला होता, असा बचाव हंडोरे यांनी केला. रात्री दहापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे पाचशे कार्यकर्ते केंद्राबाहेर होते. घोषणाबाजी सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Tension in Raipur-Congress in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.