Join us  

पालिका रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये दहा हजार रेमडिसीवीर, ७२ हजार इंजेक्शन खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 9:20 PM

मात्र पालिकेची विविध रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर्समध्ये ही इंजेक्शन्स आता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरणाऱ्या रेमडिसीवीर या इंजेक्शनचे १० हजार नग अखेर पालिका प्रशासनाने खरेदी केले आहेत. गेले काही दिवस या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता व्यक्त होत होती. मात्र पालिकेची विविध रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर्समध्ये ही इंजेक्शन्स आता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

रेमडिसीवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असल्याने  पालिकेने ७२ हजार इंजेक्शन नग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन संबंधित कंपनीकडे मागणीदेखील नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ७२ हजारांपैकी पहिल्या टप्प्यातील १० हजार रेमडिसीवीर इंजेक्शन नग बुधवारी पालिकेच्या ताब्यात आली आहेत. 

या रुग्णालयांमध्ये रेमडिसीवीर उपलब्ध....

सेव्हन हिल्स, अंधेरी -  १,५००

केईएम, परळ - ८००

नायर - मुंबई सेंट्रल .. ८००

संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) १७००

लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव (सायन) ८००

कूपर - विले पार्ले.... ६००

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी ५००

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व उपनगरीय रुग्णालये  - एक हजार

बीकेसी (एमएमआरडीए) कोविड सेंटर ५००

दहिसर कोविड सेंटर ५००

नेस्को कोविड सेंटर, गोरेगांव ५००

एन. एस. सी. आय. कोविड सेंटर, वरळी ५००

रिचर्डसन ऍण्ड क्रुडास, मुलुंड ३००

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस