दस:याला उडाली खरेदीची धूम
By Admin | Updated: October 3, 2014 23:08 IST2014-10-03T23:08:54+5:302014-10-03T23:08:54+5:30
वसई-विरार उपप्रदेशात गेले 9 दिवस नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

दस:याला उडाली खरेदीची धूम
>वसई : वसई-विरार उपप्रदेशात गेले 9 दिवस नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा गरबा खेळण्यासाठी रात्री उशीरार्पयत वेळ देण्यात आल्यामुळे तरूणाईमध्ये उत्साह निर्माण झाला होता. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर वसई-विरारकरांनी उत्साहात सोने लुटले. तसेच अनेक दुकानामध्ये सोने खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचा नवरात्र सुरू होतो. घटस्थापनेनंतर सलग 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या मंदिरात असलेला दिप सतत तेवत ठेवतात. रात्री देवीची यथासांग पुजा झाल्यानंतर गरबा खेळला जातो. यंदा वसई-विरार परिसरात अनेक भागात नवरात्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री उशीरार्पयत गरबा खेळण्यात आला. यावेळी पोलीसांनीही कार्यक्रमासाठी सवलत दिल्यामुळे तरूणाई खुश होती. आज दस:याच्या दिवशी अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने आपापल्या देवीच्या मुर्तीचे विधीवत पुजा करून विसर्जन केले.