निवडणूक आयोगाची दहा लाखांची मदत
By Admin | Updated: December 21, 2014 00:58 IST2014-12-21T00:58:32+5:302014-12-21T00:58:32+5:30
विधानसभा निवडणुकीदरम्यान कालसेकर महाविद्यालयात निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या लहू कृष्णा कांबळे या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

निवडणूक आयोगाची दहा लाखांची मदत
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान कालसेकर महाविद्यालयात निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या लहू कृष्णा कांबळे या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना निवडणूक विभागाकडून नुकतीच दहा लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
पनवेल तहसील कार्यालयात कोतवाल म्हणून लहु कांबळे कार्यरत होते. निवडणुकीच्या दरम्यान कालसेकर महाविद्यालयामध्ये कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्यावेळी कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदल्याची मागणी निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने निवडूणक विभागाने दहा लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. १९ डिसेंबरला प्रांताधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक, मंडल अधिकारी उमेश पाटील यांनी कांबळे यांच्या कुटुंबियांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. (प्रतिनिधी)