महाडमध्ये दहा उमेदवारांचे अर्ज

By Admin | Updated: September 27, 2014 22:32 IST2014-09-27T22:32:51+5:302014-09-27T22:32:51+5:30

राजकीय पक्षांसह एकूण 1क् उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

Ten Candidates Application Form in Mahad | महाडमध्ये दहा उमेदवारांचे अर्ज

महाडमध्ये दहा उमेदवारांचे अर्ज

>महाड : महाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, बसपा या राजकीय पक्षांसह एकूण 1क् उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, मनसेसह अपक्ष उमेदवारांचेही अर्ज दाखल केले. या मतदारसंघात माणिक मोतिराम जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), भरत मारुती गोगावले (शिवसेना), प्रणय बळीराम सावंत (बसपा), मंगेश मधुकर हुमणो (बहुजन मुक्ती परिषद), लक्ष्मण तुकाराम निंबाळकर (अपक्ष), सुरेंद्र काशिराम चव्हाण (मनसे), अॅड. उदय अनंत आंबोणकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पुष्पलता माणिक जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुधीर परशराम महाडीक (भाजपा), सत्यवान धोंडीराम महाडिक (भाजपा) अशा 1क् उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केले.
सर्वच राजकीय पक्षांतर्फे अर्ज दाखल झाल्याने महाड मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर होणा:या या दुस:या विधानसभा निवडणुकीत सेना - भाजपा युतीबरोबरचे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील आघाडी देखील संपुष्टात आल्यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली असून, अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या तारखेर्पयत यापैकी किती जण माघार घेतात, यावर या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
2क्क्9 च्या निवडणुकीत महाड मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले यांनी माणिक जगताप यांचा पराभव केला होता. त्यावेळी जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढले होते. मात्र आता ते काँग्रेस पक्षातर्फे रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात एकूण सुमारे 2 लाख 65 हजार इतके मतदार तर 279 मतदान केंद्रे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Ten Candidates Application Form in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.