Ten and a half thousand vehicles in Mumbai in 3 hours | मुंबईत 3 तासांत साडेदहा हजार वाहनांची झाडाझडती

मुंबईत 3 तासांत साडेदहा हजार वाहनांची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या  निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटके असलेल्या कारने खळबळ उडवली असताना,  दहशतवादी संघटनेने या कारची जबाबदारी घेतली. अशात, मुंबई पोलिसांनी सागरी सीमा सुरक्षेच्या दृष्टीने ५४ लॅंडिंग पॉइन्टची  सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क केली आहे. तसेच शनिवारी रात्री केलेल्या ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत तीन तासांत  १४३ ठिकाणी नाक़ाबंदी करत १० हजार ७९५ वाहनांची झाडाझडती घेतली आहे.  


मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यात, पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ पर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. यादरम्यान मुंबईत १४३ ठिकाणी नाकाबंदी करत १० हजार ७९५ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये २ हजार २६८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ड्रंक अँड ड्राईव्हअंतर्गत ३१ वाहनांचा समावेश आहे. 
२१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.  

अंमली पदार्थविरोधी पथकाची ८७ जणांवर कारवाई 
n ४६५ आरोपी मिळून आले. ३८ पाहिजे व फरारी आरोपीना अटक करण्यात आली आहे.  ड्रग्स विरोधात अंमली पदार्थविरोधी पथकाने ८७ जणांवर कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकूण ३२ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.     
nतसेच ९५१ हॉटेल, लॉज, मुसाफिर खान्याची झाडाझडती करण्यात आली. तसेच अवैध धंद्यावर ३५ ठिकाणी छापे टाकून ५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

सागरी गस्तीत वाढ
सागरी सीमा सुरक्षेच्या दृष्टीने ५४ लॅंडिंग पॉइन्टची  सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे.
n५१२ संवदेनशील ठिकाणची तपासणी
nप्रतिबंधात्मक कारवाईच्या दृष्टीने मुंबईतल्या ५१२ 
nमर्मस्थळे,  संवेदनशील ठिकाणांची पोलिसांनी तपासणी केली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ten and a half thousand vehicles in Mumbai in 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.