तलासरी तहसिलदार कार्यालयाची दूरवस्था
By Admin | Updated: February 10, 2015 22:34 IST2015-02-10T22:34:10+5:302015-02-10T22:34:10+5:30
कामाचा प्रचंड ताण, अपुरा कर्मचारी वर्ग त्यातच तलासरी महसूल कार्यालयाच्या इमारतीच्या छताची दुरवस्था झालेली आहे.

तलासरी तहसिलदार कार्यालयाची दूरवस्था
तलासरी : कामाचा प्रचंड ताण, अपुरा कर्मचारी वर्ग त्यातच तलासरी महसूल कार्यालयाच्या इमारतीच्या छताची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे महसूल कर्मचारी आपला जीव मुठीत धरून काम करत आहेत.
तलासरी तहसिल कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने या इमारतीच्या खिडक्या व छत कधीही तुटून पडेल अशी परिस्थिती झाली आहे. हे छत पडेल की काय अशी भीती कर्मचारी मनात ठेऊन काम करावे लागते. त्यामुळे कर्मचारीवर्ग आपले टेबल इकडे तिकडे सरकवून काम करीत आहेत. या इमारतीची देखभाल दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. याठिकाणी अनेक वेळा छताची दुरूस्ती होते. पण जीर्ण इमारतीपुढे सार्वजनिक बांधकाम विभागाची डागडुजी कमजोर पडते. (वार्ताहर)