कोपरखैरणेत आगीमध्ये तेलसाठा जळाला

By Admin | Updated: April 6, 2015 04:59 IST2015-04-06T04:59:40+5:302015-04-06T04:59:40+5:30

कोपरखैरणे येथे तेल रिफायनरी कंपनीला रविवारी दुपारी आग लागली. या आगीत तेथे साठा असलेले गोडे तेल जळून कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनी बंद असताना शॉर्टसर्किटने आग लागली.

Telangana burns in fire in Koparkhairane | कोपरखैरणेत आगीमध्ये तेलसाठा जळाला

कोपरखैरणेत आगीमध्ये तेलसाठा जळाला

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे तेल रिफायनरी कंपनीला रविवारी दुपारी आग लागली. या आगीत तेथे साठा असलेले गोडे तेल जळून कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनी बंद असताना शॉर्टसर्किटने आग लागली.
कोपरखैरणे सेक्टर १ येथे शक्तिवेग लिमिटेड या कंपनीत आगीची ही घटना घडली. सदर कंपनीत गोडे तेल रिफायनर केले जायचे. रविवारी कंपनी बंद असताना शॉर्टसर्किटने तेथे आग लागली. आगीच्या या घटनेची माहिती मिळताच वाशी व नेरुळ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तेलाच्या साठ्यामुळे तेथे लागलेली आग परिसरातही पसरण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. रहिवासी वसाहतीमध्ये ही घटना घडल्याने कोपरखैरणे पोलिसांनी खबरदारी म्हणून लगतचा परिसर मोकळा केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून केवळ कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचे वाशी अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Telangana burns in fire in Koparkhairane