बाळासाहेबांवरून ‘तहलका’!

By Admin | Updated: August 17, 2015 01:45 IST2015-08-17T01:45:36+5:302015-08-17T01:45:36+5:30

शिवसैनिकांना दैवतासमान असलेले शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख चक्क ‘दहशतवादी’ असा करून ‘तहलका’ या मासिकाने नव्या वादाला तोंड फोडले आहे

'Tehelka' from Balasaheb! | बाळासाहेबांवरून ‘तहलका’!

बाळासाहेबांवरून ‘तहलका’!

मुंबई : शिवसैनिकांना दैवतासमान असलेले शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख चक्क ‘दहशतवादी’ असा करून ‘तहलका’ या मासिकाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. बाळासाहेबांचा अपमान झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, सदर मासिकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजपा, राष्ट्रवादीसह एमआयएमने तहलकाचा निषेध केला असला तरी ‘जुनं मढं उकरून काढू नका,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा दुर्लक्षित केला.

नेत्यांकडून निषेध
या मासिकाचा निषेध करतो. बाळासाहेब ठाकरे हे महान नेते होते. त्यांच्यावर अशी असभ्य टीका करणे अयोग्य आहे. - रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष

बाळासाहेबांच्या चारित्र्यहननाचा प्रकार सहन केला जाणार नाही.
- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी

ठाकरे हे मराठी माणसांचे नेते होते. त्यांच्याबाबत असे मत व्यक्त करणे निषेधार्ह आहे. - आ. वारीस पठाण, एमआयएम

ज्या मासिकात लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अडकलेल्या तरुण तेजपालच्या लायकीची माणसे काम करतात.. त्यामुळे ‘जुनं मढं उकरून काढू नका. - उद्धव ठाकरे

(विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'Tehelka' from Balasaheb!