जेटच्या विमानात तांत्रिक बिघाड

By Admin | Updated: May 12, 2016 03:02 IST2016-05-12T03:02:42+5:302016-05-12T03:02:42+5:30

राष्ट्रीय विमानतळावरून कोलकात्याकडे उड्डाण घेणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांना फटका बसला

The technical failure of the jet plane | जेटच्या विमानात तांत्रिक बिघाड

जेटच्या विमानात तांत्रिक बिघाड

मुंबई : राष्ट्रीय विमानतळावरून कोलकात्याकडे उड्डाण घेणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांना फटका बसला. जेट एअरवेजचे ९ डब्लू ६१५ हे विमान बुधवारी सकाळी मुंबईहून कोलकात्याकडे उड्डाण घेणार होते. परंतु ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला.
काही वेळाने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर विमानाने कोलकात्याकडे उड्डाण घेतले, अशी माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने दिली. मंगळवारीही ९ डब्लू ४१६ हे विमान जयपूरला जाणार होते. बिघाडामुळे या उड्डाणालाही चार तास विलंब झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: The technical failure of the jet plane