Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोपर रेल्वे स्थानकादरम्यान एसी ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; साडे दहाला दादरला प्रवाशांची तुफान गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 23:25 IST

डोंबिवली स्टेशन परिसरात एका मागे एक अशा ट्रेनच्या लागल्या रांगा लागल्या होत्या.

कोपर रेल्वे स्थानकादरम्यान एसी ट्रेन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने रेल्वे सेवा ठप्प पडली आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या 7. 56 मिनिटाच्या एसी लोकल ट्रेनमध्ये झाला तांत्रिक बिघाड झाला. यामुळे मध्य रेल्वेचे सर्व वेळापत्रक कोलमडले आहे. दादर स्टेशनला रात्री साडे दहा वाजता देखील मोठी गर्दी होती. 

या बिघाडामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या काही लोकल केल्या रद्द करण्यात आल्या. तर कल्याण आणि डोंबिवली दरम्यान धीम्या मार्गावरील  वाहतूक रोखण्यात आली होती. ही ट्रेन कारशेडमध्ये नेण्यात आली. या बिघाडामुळे कामावरून  घरी परतत असलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. 

डोंबिवली स्टेशन परिसरात एका मागे एक अशा ट्रेनच्या लागल्या रांगा लागल्या होत्या. तर कल्याण डोंबिवली सह अनेक स्टेशन वरती प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

टॅग्स :लोकल