सरावाच्या अश्रूधुराने डोळ्य़ात पाणी
By Admin | Updated: September 18, 2014 02:37 IST2014-09-18T02:37:06+5:302014-09-18T02:37:06+5:30
घाटकोपरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून दंगल नियंत्रण पथकाचा अश्रूधुरांच्या नळकांडय़ा फोडण्याचा सराव सुरू असतो.

सरावाच्या अश्रूधुराने डोळ्य़ात पाणी
मुंबई : घाटकोपरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून दंगल नियंत्रण पथकाचा अश्रूधुरांच्या नळकांडय़ा फोडण्याचा सराव सुरू असतो. मात्र हाच सराव घाटकोपर येथील नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. या धुरामुळे अनेकांना श्वसनाचा त्रस जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालय गाठण्याची वेळ आली आहे.
घाटकोपर, बर्वेनगर, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, भटवाडी परिसरातील रहिवाशांना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास डोळे चुरचुरणो, श्वास घेण्यात अडचण, अंगाला खाज सुटणो, खोकला असा त्रस जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांना रुग्णालय गाठावे लागले. जवळ जवळ 4क् पेक्षा जास्त नागरिकांना हा त्रस झाला. ही बाब पोलीस तसेच अग्निशमन दलाला समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तपास करीत असताना डोंगराळ भागातून धूर येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बर्वेनगर येथील डोंगराळ भागात सध्या पोलीस प्रशिक्षण सुरू आहे. अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्याने हा प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले.
याविषयी माहिती देताना घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून येथे फायरिंग आणि अश्रूधुराचा मारा कसा करावा याचा सराव सुरू असतो. नेहमीप्रमाणो आजही सकाळी असाच सराव सुरू होता. त्यावेळी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्या. पण पाऊस नसल्याने कदाचित हवेचा मार्ग बदलला आणि हा धूर वस्त्यांमध्ये गेला असावा. त्यातही लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ तेथील सराव बंद करण्यात आला होता. काही तासांनंतर अश्रूधुराची तीव्रता कमी झाली आणि हा त्रस निवळला.
या प्रशिक्षण केंद्राच्या बाजूलाच सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, बर्वे नगर अशी दाट लोकसंख्या असलेल्या वस्त्या, दोन शाळा आणि मुक्ताबाई रुग्णालय आहे. या संपूर्ण परिसरातील लोकांना अश्रूधुराने काही तास हैराण केले होते, पैकी काही रहिवाशांना जास्त त्रस झाल्याने मुक्ताबाई रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)
च्याबाबत स्थानिक बर्वेनगर येथील रहिवासी जितेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी कामावर जात असताना अचानक गुदमरल्यासारखे झाले.
च्हा त्रस एकटय़ालाच झाला नसून परिसरातील अनेक नागरिक या त्रसाने पीडित झाल्याचे दिसून आले. आम्ही सर्वानीच जवळच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर अनेकांनी धुराचा शोध घेतला, असेही चव्हाण यांनी सांगितले.
मी कॉलेजमधून घरी आल्यावर मला श्वास घेण्यास त्रस होऊ लागला, डोळे झोंबू लागले आणि जोरात खोकला येऊ लागला. आमच्या आजूबाजूच्या लोकांनाही असाच त्रस होऊ लागला. त्यामुळे मला रुग्णालयात यावे लागले.
- तृप्ती राजेंद्र पाडेकर, कॉलेज विद्यार्थिनी