३५ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
By Admin | Updated: April 29, 2015 02:05 IST2015-04-29T02:05:09+5:302015-04-29T02:05:09+5:30
एका पोलीस शिपायाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी वाहतूक पोलीस विभागातील ३५ अधिकाऱ्यांची तडकाफडकी सशस्त्र विभागात बदली करण्यात आली. बदली

३५ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
मुंबई : चिरीमिरी घेण्यासाठी वरिष्ठांकडून येणाऱ्या दबावाबाबत एका पोलीस शिपायाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी वाहतूक पोलीस विभागातील ३५ अधिकाऱ्यांची तडकाफडकी सशस्त्र विभागात बदली करण्यात आली. बदली झालेल्यांमध्ये निरिक्षक, सहाय्यक निरिक्षक आणि फौजदारांचा सहभाग आहे. सुनील डोके या पोलीस शिपायाने चिरीमिरी घेण्यासाठी वरिष्ठांकडून येणाऱ्या दबावाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर वाहतूक विभागाचे नवनियुक्त सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी चिरीमिरी घेण्यात अव्वल असलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार केली. ती यादी आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.