राज ठाकरे यांच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 06:32 IST2018-06-28T06:32:48+5:302018-06-28T06:32:56+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर एका तरुण प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाविद्यालयातील प्राचार्यांकडून होत असलेल्या कथित छळामुळे भारत

राज ठाकरे यांच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर एका तरुण प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाविद्यालयातील प्राचार्यांकडून होत असलेल्या कथित छळामुळे भारत गीते या प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
आत्महत्येचा प्रयत्न करणारा प्राध्यापक रहेजा कॉलेजमध्ये कला शिक्षक आहे. कॉलेज प्रशासन कला विभाग बंद करत आहे. याविरोधात चार वर्षांपासून आपला लढा सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही उपयोग झाला नाही. राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी या शिक्षकाने लिहिली आहे. बुधवारी दुपारी फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा राज यांच्या घराबाहेरील पोलिसांनी त्याला रोखले व हिंदुजा रुग्णालयात उपचारास दाखल केले.