Join us

शिक्षकांना मराठी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:59 IST

पालिका शाळेतील अमराठी शिक्षकांनाही आता मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

मुंबई : पालिका शाळेतील अमराठी शिक्षकांनाही आता मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्यांचे वेतन कापण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार पालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना एमएस-सीआयटी परीक्षा पास होणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना एमएस-सीआयटी आणि अमराठी शिक्षकांना मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत सूचित करणारे परिपत्रक काढणे अपेक्षित होते. मात्र लेखा विभागाकडून कर्मचाºयांच्या वेतनात त्रुटी काढून वेतनातून वसुली करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक के. पी. नाईक यांनी केला आहे. धोरणात्मक निर्णय होईपर्यंत अशा वसुलीला प्रशासनाने स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.याबाबत माजी नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र दिले होते. मात्र आयुक्तांनी अभिप्राय देताना शासन निर्णयानुसार अधिकारी-कर्मचाºयांना संगणक प्रशिक्षण योजनेतील एमएस-सीआयटी आणि मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना मराठीची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. पगार कापण्याचा इशारा देण्यात आला तरी नेमका किती पगार कापला जाणार? हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.>बदली धोरणाबाबतची मागणी फेटाळलीमुंबई शहराचे वातावरण कोंदट आणि प्रदूषित आहे. त्यामुळे येथे आजाराचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील आजार आणि शहरी भागातील आजार यामध्ये तफावत असल्यामुळे दोन्ही भागांतील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये समान धोरण ठरवणे उचित नाही, असे मत के. पी. नाईक यांनी व्यक्त केले होते. मात्र ही मागणी पालिका प्रशासनाने फेटाळून लावली आहे.