विद्यापीठात लवकरच शिक्षकांसाठी सनद

By Admin | Updated: March 26, 2015 00:42 IST2015-03-26T00:42:02+5:302015-03-26T00:42:02+5:30

मुंबई विद्यापीठाचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न निर्धारित वेळेत मार्गी लागावेत,

Teacher's certificate for teachers soon | विद्यापीठात लवकरच शिक्षकांसाठी सनद

विद्यापीठात लवकरच शिक्षकांसाठी सनद

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न निर्धारित वेळेत मार्गी लागावेत, यासाठी विद्यापीठाची विद्यार्थी शिक्षक सनद तयार करण्याचा निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या
सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. सिनेट बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केल्याने विद्यापीठात लवकरच सनद स्थापन होणार आहे.
नागरिकांचे प्रश्न विहित मुदतीत मार्गी लागावेत, यासाठी राज्य शासनाने नागरिकांची सनद जाहीर केली आहे. याच धर्तीवर विद्यापीठातील विद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने लागावेत, यासाठी विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सनद तयार करण्याचा ठराव सिनेट सदस्य अंबादास मोहिते यांनी सिनेट बैठकीत मांडला. या ठरावाला सिनेट सदस्यांनी एकमताने समर्थन दिल्यानंतर कुलगुरुंनी हा प्रस्ताव मंजूर केला.
विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर ते निकाली काढण्यात येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे अर्ज निर्धारित वेळेत मार्गी लावण्यासाठी ही सनद लाभदायी ठरणार आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांचे अर्ज केल्यानंतर त्यांनी विद्यापीठाकडे केलेल्या अर्जाची स्थिती काय आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार आहे. (प्रतिनिधी)

पगार नियंत्रण कायद्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील कंत्राटी प्राध्यापकांना अत्यल्प वेतन देण्यात येत असल्याबद्दल सिनेट बैठकीत वादळी चर्चा झाली. राज्य सरकार ज्याप्रमाणे फी नियत्रंण कायदा प्रत्यक्षात आणणार आहे, त्याच धर्तीवर प्राध्यापकांसाठी पगार नियंत्रण कायदा करता येईल, असे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी सांगितले. यासंदर्भात सरकारशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

सात एप्रिलला बैठक
प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवरुन बुधवारी सिनेट बैठक गाजली. अनेक सदस्यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत, अशी मागणी बुक्टो, युवा सेना आणि मनविसेसह इतर सदस्यांनी यावेळी केली.


चार महाविद्यालयांवर होणार कारवाई
पेंढारकर, नेने, विल्सन आणि बुऱ्हाणी महाविद्यालयातील प्रश्नांकडे सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधल्यानंतर बुधवारी कुलगुरुंनी या चारही महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य केंद्राबाबत पालिकेशी चर्चा करणार
कलिना कॅम्पस येथे विद्यापीठाचे आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात पालिकेच्या केईएम, सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलविण्याबाबत पालिकेशी चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: Teacher's certificate for teachers soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.