खासगी शिकवणीत शिक्षकाने केला विनयभंग
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:13+5:302014-11-21T22:38:13+5:30
खासगी शिकवणीत शिक्षकाने केला विनयभंग, शिक्षक अटकेत

खासगी शिकवणीत शिक्षकाने केला विनयभंग
ख सगी शिकवणीत शिक्षकाने केला विनयभंग, शिक्षक अटकेतमुंबई : कांदिवली चारकोप येथे विनयभंगप्रकरणी एका खासगी शिकवणी घेणार्या शिक्षकाला १५ वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुरुवारी अटक केली आहे. नववीत शिकणारी पीडित मुलगी आरोपी शिक्षकाकडे खासगी शिकवणीला जात होती. त्या वेळी आरोपी मुलीला लवकर किंवा दुसरे विद्यार्थी येण्याआधी बोलावून तिच्याशी तो गैरवर्तन करीत होता. गेले कित्येक दिवस मुलगी सतत तणावाखाली वावरत असल्याचे आणि शिकवणीला जाण्याकरिता टाळाटाळ करीत असल्याचे पालकांच्या लक्षात आले असता, त्यांनी मुलीची विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पालकांनी याबाबत चारकोप पोलीस ठाण्यात बुधवारी तक्र ार दिली असता, पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. (प्रतिनिधी)