Join us

दिव्यांग डब्यातील सामान्य प्रवाशाला आता टीसी ठोठावणार दंड, जागेवरच दंड वसुलीचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:39 IST

Mumbai News: मध्य रेल्वेने आता दिव्यांगजनांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार तिकीट तपासनिसांना (टीसींना) अशा प्रवाशांना जागेवरच दंड आकारण्याचा अधिकार देण्यात यावा, असा प्रस्ताव वाणिज्य विभागाकडून मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- महेश कोले मुंबई - मध्य रेल्वेने आता दिव्यांगजनांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार तिकीट तपासनिसांना (टीसींना) अशा प्रवाशांना जागेवरच दंड आकारण्याचा अधिकार देण्यात यावा, असा प्रस्ताव वाणिज्य विभागाकडून मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात सर्वसाधारण प्रवासी दिव्यांगांच्या डब्यात चढला तर आरपीएफच्या कायदेशीर कारवाईसोबतच टीसींकडून त्यांना तत्काळ दंडही ठोठावण्यात येऊ शकतो.

मुंबई विभागात उपनगरीय तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये सामान्य प्रवाशांकडून सातत्याने अनधिकृत प्रवास केला जातो. गर्दीच्या किंवा मोकळ्या वेळातसुद्धा हे डबे बिनधास्त वापरले जातात. अशावेळी दिव्यांग प्रवाशांना जागा न मिळणे, त्रास सहन करावा लागणे आणि कधी कधी मारहाणीच्या घटना घडणे असे प्रकार वाढले आहेत.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा करत अनेकदा वृत्त प्रसिद्ध केले होते. यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणीही त्यामध्ये केली होती. 

नवा प्रस्ताव काय म्हणतो? मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार, दिव्यांग डब्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्यांकडून ‘फर्स्ट क्लासच्या तिकिटाइतका दंड’ वसूल करण्याचा अधिकार टीसींना देण्याचे नमूद केले आहे. याच्या अंमलबजावणीमुळे दिव्यांग डब्यात अनधिकृत प्रवेश रोखण्यात मदत होणार असून हा प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे काम करेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

असे आहेत सध्याचे दंड (रुपयांमध्ये) प्रवास श्रेणी    दंडाची रक्कमसामान्य ( सेकंड)     २५० अधिक  सामान्य तिकीट भाडेफर्स्ट क्लास    २५० अधिक  फर्स्ट क्लास तिकीट भाडेएसी    २५० अधिक एसी तिकीट भाडेदिव्यांग डब्यातील विनातिकीट   २५० अधिक फर्स्ट क्लास तिकीट भाडेदिव्यांग प्रवाशासाठीचा दंड

कधी कारवाई हाेते? चुकीच्या तिकिटावर प्रवासचुकीच्या डब्यात प्रवासअनुमतीपेक्षा अधिक तसेच बुक न केलेल्या सामानाची वाहतूक रेल्वे परिसरात धूम्रपानआरएमएस, पॅन्ट्री कोचमध्ये प्रवास

प्रक्रिया वेळखाऊया अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. यामध्ये अटक करून संबंधित प्रवाशाला रेल्वे दंडाधिकाऱ्यापुढे हजर करावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि संसाधनांचा मोठा वापर करणारी असल्यामुळे अंमलबजावणी प्रभावी होत नाही. 

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वे