टीसीच्या तत्परतेने मिळाली मदत
By Admin | Updated: August 8, 2014 01:59 IST2014-08-08T01:59:45+5:302014-08-08T01:59:45+5:30
लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना अनेकदा टीसींचा रुद्रावतार किंवा कामचुकारपणा प्रवाशांना दिसून येतो.

टीसीच्या तत्परतेने मिळाली मदत
>मुंबई : लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना अनेकदा टीसींचा रुद्रावतार किंवा कामचुकारपणा प्रवाशांना दिसून येतो. मात्र एका घटनेत टीसीची कामातील तत्परता दिसून आल्याचे उजेडात आले आहे. कोकण मार्गावर धावणा:या मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणा:या एकाच कुटुंबातील तीन जणांना एका टोळीने गुंगीचे औषध देऊन लुटल्यानंतर टीसीने मदत केली आणि त्यामुळे चोरीची घटनाही उघडकीस आली.
3 ऑगस्ट रोजी मंगला एक्स्प्रेस साडे नऊच्या सुमारास पनवेल स्थानकात आली असता टीसी व्ही.के. चेंदवनकर हे त्या गाडीत चढले. रोहा स्टेशनजवळ गाडी आली असता एस-10मध्ये तिकीट तपासत असतानाच बर्थ क्रमांक 50 आणि 51वरील प्रवासी बेशुद्धावस्थेत तर 53वरील प्रवासी अर्धवट शुद्धीत आढळला. यातील अर्धवट शुद्धीत असलेल्या महिला प्रवाशाला विचारल्यानंतर ते सर्व जण एकाच परिवारातले असल्याचे स्पष्ट झाले. नाशिक दरम्यान कुणा एका व्यक्तीने चहा दिल्यानंतर सर्व जण बेशुद्ध झाले. याची माहिती मिळताच वेळ न घालवता चेंदवनकर यांनी बेलापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण
कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने कोलाड आणि चिपळूण येथील रेल्वे सुरक्षा दल तसेच वैद्यकीय कर्मचा:यांना ही माहिती दिली. तीनही प्रवाशांना चिपळूण येथे उतरवून मदत देत असल्याचे सांगत धीर दिला.
या वेळी चेंदवनकर यांनी या परिवारातील त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून चिपळूण येथे येण्यास सांगितले. मात्र नातेवाइकांनी
मडगाव येथे उतरवून त्यांना ताब्यात देण्यास सांगितले. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चिपळून येथेच उतरवून सर्वांना त्यांच्या नातेवाईक आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे सुपुर्द केले. (प्रतिनिधी)
कौतुकाची थाप
च्एका टीसीच्या तत्परतेमुळे वेळीच ही घटना उघडकीस आल्याने चेंदवनकर यांच्यावर सर्व थरातून कौतुकाची थाप पडत आहे. या तीन प्रवाशांकडे असलेल्या सामानातून 22 हजार रुपये रोख, 3 तोळ्यांची सोन्याची चेन, 3 सोन्याच्या बांगडय़ा, एटीएम कार्ड चोरीला गेल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.