मतदानात टॅक्सीचालक उदासीन!
By Admin | Updated: July 7, 2014 02:09 IST2014-07-07T02:09:57+5:302014-07-07T02:09:57+5:30
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक विघ्नांचा सामना करीत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनची त्रैवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया अखेर रविवारी दादर येथे शांततेत पार पडली.

मतदानात टॅक्सीचालक उदासीन!
मुंबई : औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक विघ्नांचा सामना करीत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनची त्रैवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया अखेर रविवारी दादर येथे शांततेत पार पडली. या दिवसभराच्या निवडणुकीत केवळ १२ टक्केच मतदान झाल्याने निवडणुकीबाबत टॅक्सीचालक मात्र उदासीन दिसले.
मुंबईतील एकूण २३ हजार २७८ मतदारांपैकी केवळ २ हजार ८४६ टॅक्सीचालकांनी आज मतदान केले. याआधी युनियनमध्ये असलेल्या दोन गटांतील अंतर्गत वादामुळे या निवडणुकीला रंगत आली होती. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निवृत्त प्रादेशिक कामगार अधिकारी शिवराम कृष्णा यांच्या देखरेखीखाली रविवारी मतदान घेण्यात येणार होते. मात्र बुधवारी २ जुलैला ना-हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या शिवाजी पार्क पोलीस प्रशासनाने गुरुवारी ३ जुलैला प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामुळे निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर विरोधी पॅनेल्सचे सदस्य निवडणूक होऊ नये, म्हणून पोलिसांवर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी केला होता. शिवाय प्रमाणपत्राअभावी निवडणूक रद्द झाल्यास संपावर जाण्याचा इशाराही क्वाड्रोस यांनी दिला होता. (प्रतिनिधी)