आता उबरकडून दिवसभरासाठी टॅक्सी
By Admin | Updated: February 7, 2017 01:51 IST2017-02-07T01:51:44+5:302017-02-07T01:51:44+5:30
टॅक्सी सेवा पुरविणारी जागतिक कंपनी उबरने नवी उबरहायर ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आता संपूर्ण दिवसभरासाठी टॅक्सी भाड्याने मिळविता येईल

आता उबरकडून दिवसभरासाठी टॅक्सी
मुंबई : टॅक्सी सेवा पुरविणारी जागतिक कंपनी उबरने नवी उबरहायर ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आता संपूर्ण दिवसभरासाठी टॅक्सी भाड्याने मिळविता येईल. एका दिवसात अनेक ठिकाणी जाण्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे. ज्येष्ठ नागरिक, व्यवसायिक प्रवासी आणि पर्यटक यांना नजरेसमोर ठेवून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या रोख पेमेंटवरच उपलब्ध आहे. कोची येथे प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा राबविण्यात आली. आता ती नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे, अहमदाबाद, नागपूर या शहरांत सुरू झाली आहे.