धास्तावलेल्या थकबाकीदारांनी भरला कर, महापालिकेच्या जप्तीच्या परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:20 AM2020-03-07T00:20:17+5:302020-03-07T00:20:20+5:30

या कारवाई अंतर्गत शुक्रवारी दोन थकबाकीदारांनी आपली गाडी सोडवून घेण्यासाठी तब्बल एक कोटी २८ लाख रुपये थकीत कर भरल्याचे समोर आले आहे.

Tax paid by scared dues, results of municipal seizure | धास्तावलेल्या थकबाकीदारांनी भरला कर, महापालिकेच्या जप्तीच्या परिणाम

धास्तावलेल्या थकबाकीदारांनी भरला कर, महापालिकेच्या जप्तीच्या परिणाम

Next

मुंबई : मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. पहिल्यांदाच घरातील सामानही जप्त करण्यास सुरुवात झाल्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई करण्यास येणाऱ्या कर निर्धारक व संकलन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या हातात चक्क थकीत कराचे धनादेश पडत आहेत. या कारवाई अंतर्गत शुक्रवारी दोन थकबाकीदारांनी आपली गाडी सोडवून घेण्यासाठी तब्बल एक कोटी २८ लाख रुपये थकीत कर भरल्याचे समोर आले आहे.
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील लक्ष्य गाठण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. या अंतर्गत मालमत्ता कर थकविणाºया करदात्यांवर थेट जप्तीची कारवाई सुरू आहे. यामध्ये मालमत्तांबरोबरच घरातील वस्तूही ताब्यात घेण्यास पालिकेने सुरू केले आहे. यामुळे अशी कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारही आता तत्काळ थकीत रक्कम भरू लागले आहेत. गेल्या आठवड्यात पालिकेने एका विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त केली होती.
शुक्रवारी दहिसर येथील ‘मे. एनआरओ एन रोज’ या कंपनीकडे असलेल्या एक कोटी सहा लाखांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी ‘किआ’ कंपनीचे उच्च श्रेणीतील चार चाकी वाहन जप्त केले.
तर अंधेरी पश्चिम येथील ‘मे. लष्करीया प्रॉपर्टीज्’ यांच्या दोन वाहनांना ‘जामर’ बसवून ती स्थानबद्ध करण्यात आली.
या कारवाईनंतर दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे ७८ लाख व ५० लाख असा एकूण रुपये एक कोटी २८ लाखांचा कर भरला आहे. तसेच त्या कंपन्यांनी मालमत्ता कराची उर्वरित रक्कम लवकरात लवकर भरण्याची हमी दिली, ज्यानंतर त्यांची वाहने सोडण्यात आली.
मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाºयांवर महापालिकेने
गेल्या आठवड्यापासून कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत पालिकेच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चल संपत्ती जप्त करण्यात येत आहे.  ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप’द्वारेदेखील आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे.
अधिनियम १८८८च्या कलम २०३ अन्वये जलजोडणी खंडित करणे, मालमत्तेची अटकावणी करणे, मालमत्तेची जप्ती करणे यांसारखी कारवाई करण्यात येत असे. मात्र, यंदा प्रथमच याच कायद्यातील कलम २०५ व २०६ चा वापर करण्यात येत आहे. या कलमांनुसार थकबाकीदारांच्या घरातील किंवा कार्यालयातील दुचाकी, चार चाकी वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारखी चल संपत्ती जप्त करण्यात येत आहे. मात्र स्त्री-धन, जडजवाहिर, दागिने यांसारख्या वस्तू या कारवाईतून वगळण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Tax paid by scared dues, results of municipal seizure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.