मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप

By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T01:00:32+5:302014-11-30T01:00:32+5:30

मुंबई महानगरासाठी 7 हजार 843 टॅक्सी परवान्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली.

Tax licenses distributed at the hands of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप

मुंबई :  मुंबई महानगरासाठी 7 हजार 843 टॅक्सी परवान्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. आज सायंकाळी विधानभवनात ऑनलाइन लॉटरीद्वारे परवाने वाटपाचा कार्यक्रम पार पडला. 
परिवहन विभागातील टॅक्सी परवान्यांचे वाटप ऑनलाइन लॉटरी पद्धतीने झाल्यामुळे या प्रक्रियेत पूर्णत: पारदर्शकता आली आहे. आता प्रत्यक्ष परवाने वाटप करताना संबंधित अर्जदाराची कागदपत्रे, चारित्र्य आदींची पुन्हा पडताळणी करण्यात यावी, जेणोकरून मुंबईकरांना सुयोग्य टॅक्सी परवानाधारक, मालक तसेच चालकांकडून चांगली, सुरक्षित आणि विश्वासार्ह परिवहन सुविधा मिळू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  
मुंबई महानगर क्षेत्रत नूतनीकरण न झालेले, रद्द झालेले एकूण 19 हजार 687 टॅक्सी परवाने होते. यापैकी फोन फ्लीट टॅक्सी योजनेसाठी 4 हजार परवाने लिलाव पद्धतीने वितरित करण्यात आले. उर्वरित 15 हजार 687 परवान्यांपैकी 5क् टक्के म्हणजे 7 हजार 843 परवान्यांची आज ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यासाठी पात्र इच्छुकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. 27 हजार 87 अर्जदार ऑनलाइन लॉटरीसाठी पात्र ठरले होते. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Tax licenses distributed at the hands of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.