मराठी, गुजराती चित्रपटांना कर सवलत
By Admin | Updated: October 29, 2014 01:02 IST2014-10-29T01:02:12+5:302014-10-29T01:02:12+5:30
निवडणुकीचे वर्ष सरल्यामुळे अनेक रखडलेल्या योजना व सवलतींचा मार्ग अखेर मोकळा होणार आह़े

मराठी, गुजराती चित्रपटांना कर सवलत
मुंबई : निवडणुकीचे वर्ष सरल्यामुळे अनेक रखडलेल्या योजना व सवलतींचा मार्ग अखेर मोकळा होणार आह़े त्यानुसार मराठी व गुजराती चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग आणि तमाशाला रंगभूमी करात सवलत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला आह़े ही सवलत 15 टक्क्यांर्पयत वाढविण्याची मागणी होती़ परंतु प्रशासन सहा टक्क्यांच्या सवलतीवरच ठाम राहिले आह़े
चित्रपट, नाटक, आनंद बाजार, सर्कसचे खेळ यावर रंगभूमी कर लावण्याचा अधिकार पालिकेला आह़े मागच्या वर्षी प्रशासनाने मराठी व गुजराती चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग व तमाशांना 2क्13-14 या आर्थिक वर्षात रंगभूमी कराच्या अधिदानात सवलत दिली होती़ ही सवलत या वर्षीही सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आह़े
हा प्रस्ताव लोकसभा निवडणुकांदरम्यानच पटलावर आणण्यात आला होता़ मात्र आधी लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीच्या अचारसंहितेमुळे ही सवलत लांबणीवर पडली़ दरम्यान, सहा टक्के कराची सवलत 15 टक्के करण्याची मागणी सुरू आह़े त्यामुळे उद्याच्या बैठकीत स्थायी समिती यावर कोणती भूमिका घेणाऱ, याकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े (प्रतिनिधी)
करमणुकीचे प्रकारसवलत
वातानुकूलित चित्रपटगृह प्रत्येक खेळ 56़4क् रु़
बिगर वातानुकूलित चित्रपटगृहप्रत्येक खेळ 42़3क् रु़
नाटक, जलसा, तमाशाप्रत्येक खेळ 23़5क् रु़
सर्कस, आनंदमेळाप्रतिदिन 47 रुपय़े
इतर कोणतीही करमणूकप्रत्येक खेळ 28़2क् रु़