Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक झोपडीधारकांकडून ३२ कोटींचा कर वसूल; रेडी रेकनरनुसार होतेय आकारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:25 IST

मुंबईत विविध जमिनींवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. अनेक झोपड्यांचा वापर व्यवसायासाठी होत आहे. पालिकेकडून झोपडीधारकांना मूलभूत सेवा, सुविधाही पुरवल्या जात असताना त्यांच्याकडून मालमत्ता कराची आकारणी होत नव्हती.

मुंबई : महापालिकेच्या कर विभागाने आतापर्यंत झोपडपट्ट्यांमधील १० हजार ७७० व्यावसायिक गाळ्यांकडून ३२ कोटी तीन लाख रुपयांच्या मालमत्ताकर वसूल केला आहे. एकूण करआकारणी आणि त्यावरील दंडाची रक्कम ही ५३ कोटी ४६ लाख रुपये आहे.

मुंबईत विविध जमिनींवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. अनेक झोपड्यांचा वापर व्यवसायासाठी होत आहे. पालिकेकडून झोपडीधारकांना मूलभूत सेवा, सुविधाही पुरवल्या जात असताना त्यांच्याकडून मालमत्ता कराची आकारणी होत नव्हती. पालिकेने उत्पन्नवाढीच्या दृष्टीने झोपड्यांमधील व्यावसायिक गाळांकडून क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिल्या होत्या. त्यामुळे गाळ्यांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले.  राज्य सरकारच्या २ फेब्रुवारी २०२२ च्या अध्यादेशानुसार ५०० चौरस फूट किंवा त्याहून कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी सदनिका आणि गाळेधारकांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. मात्र, ही सवलत व्यावसायिक गाळ्यांसाठी नसल्याने पालिकेने त्यांच्याकडून कर लागू करण्याचा निर्णय घेतला.

रेडी रेकनरनुसार होतेय आकारणी

वॉर्डस्तरावर व्यावसायिक गाळ्यांचे सर्वेक्षण करताना गाळेधारकांकडे कागदपत्रे मागितली जात आहेत.

दुकानाचे आकारमान लक्षात घेऊन रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता करवसुली केली जात आहे.

वांद्रे, धारावी, गोवंडीत मोठ्या प्रमाणावर गाळे

वांद्रेतील बेहरामपाडा, गरीब नगर, खेरवाडीतसेच धारावी, चेंबूर चिता कॅम्प, दहिसर गणपत पाटील नगर, शिवाजीनगर, बैंगनवाडी, गोवंडी, कुर्ला आदी झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्यांचा व्यावसायिक वापर होत आहे. त्यामुळे येथून सर्वाधिक झोपड्यांवर मालमत्ता कर आकारणी होत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

व्यावसायिक गाळ्यांवरील करआकारणी (रुपयांत)

विभाग  मालमत्ता कर    दंड     संकलन

शहर    १,५३,०३,९११    १,३४५  १,५३,०५,२५६

पश्चिम उपनगरे  २,२७,५१,६२०    १,७८,८४०       २,२९,३०,४६०

पूर्व उपनगरे     २८,१९,९०,९७२   ९८,६०० २८,२०,८९,५७

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: ₹32 Crore Tax Recovered From Commercial Slum Dwellers

Web Summary : Mumbai municipality recovered ₹32 crore in property tax from 10,770 commercial slum properties. Assessments follow ready reckoner rates. The drive targets commercial spaces in slums like Dharavi, Govandi, where significant commercial activity occurs.
टॅग्स :मुंबई