Join us  

नानांविरोधात पोलिसांनी तक्रार न घेतल्यास कोर्टात जाऊ - तनुश्री दत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 4:15 AM

अभिनेते नाना पाटेकर, कोरियोग्राफर गणेश आचार्य व इतरांविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल न केल्यास, त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची तयारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सुरू केल्याची माहिती, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली.

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर, कोरियोग्राफर गणेश आचार्य व इतरांविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल न केल्यास, त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची तयारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सुरू केल्याची माहिती, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली. शनिवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात तिने तक्रार अर्ज दिला असून, पोलिसांकडून त्याबाबत शाहनिशा करण्याचे काम सुरू आहे.तनुश्रीने शनिवारी पोलिसांना तक्रार अर्ज देऊन २६ मार्च, २००८ रोजी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी घडलेल्या घटनेचे सविस्तर वर्णन केले आहे. आपल्यावरील अत्याचाराबाबत तिने नाना, आचार्यसह निर्माता समीर सिद्दीकी, चित्रपटदिग्दर्शक राकेश सारंग आणि मनसेच्या कार्यकर्त्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. अद्यापपोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. त्याबाबत तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदघेऊन तनुश्रीची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘तक्रार अर्जाबाबत पोलिसांकडून माहिती घेण्यासाठी मंगळवारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ, पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ. तनुश्री सध्या मुंबईबाहेर असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकर