मुलगा न झाल्याने जन्मदात्रीनेच केली तान्हुलीची हत्या !
By Admin | Updated: April 16, 2015 10:11 IST2015-04-16T02:27:59+5:302015-04-16T10:11:55+5:30
येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांच्या एका मुलीचा हॉस्पिटलच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची घटना ११ मार्च रोजी घडली होती.

मुलगा न झाल्याने जन्मदात्रीनेच केली तान्हुलीची हत्या !
डोंबिवलीत गूढ उकलले
डोंबिवली : येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांच्या एका मुलीचा हॉस्पिटलच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची घटना ११ मार्च रोजी घडली होती. महिनाभराच्या तपासानंतर रामनगर पोलिसांनी जन्मदात्या आईनेच हत्या केल्याच्या संशयावरून तिला अटक केली. सुजाता गायकवाड असे त्या मातेचे नाव असून ती नाऱ्हेन गाव, ता. अंबरनाथ येथील रहिवासी आहे. प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करून मला मुलगा झाला पाहिजे. तो झाल्यावर आॅपरेशन करण्याबाबतची माहितीही पोलिसांना तपासात मिळाली. मात्र मुलगी झाल्याने नाराज होऊन डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशीच तिने ही हत्या केल्याच्या संशयावरून ही अटक करण्यात आली आहे.