तळोजा, वाशीत आज वीज नाही
By Admin | Updated: September 12, 2014 00:54 IST2014-09-12T00:54:07+5:302014-09-12T00:54:07+5:30
महावितरण कंपनीच्या वाशी विभागाच्या अखत्यारीत रेणाऱ्या कोपरखैरणे, हाडिंयाली, लिंक लाईन, फिलिप्स, मॅफको कोल्ड स्टोरेज आणि तळोजा एमआयडीसी या वाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले आहे

तळोजा, वाशीत आज वीज नाही
नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या वाशी विभागाच्या अखत्यारीत रेणाऱ्या कोपरखैरणे, हाडिंयाली, लिंक लाईन, फिलिप्स, मॅफको कोल्ड स्टोरेज आणि तळोजा एमआयडीसी या वाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले आहे. त्यामुळे रबाळे, एमआयडीसी परिसर, कोपरखैरणे, एपीएमसी सेक्टर २६,एनएमएमटी स्ट्रीट लाईट आदी परिसराची सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत वीज पुरवठा बंद राहणार आहे. सानपाडा तुर्भे गाव, मिनी मार्केटचा काही परिसराचा वीज पुरवठा सकाळी १० ते १०.३० आणि दुपारी ४.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत खंडीत केला जाणार आहे. तसेच तळोजा एमआयडीसी परिसराचा वीज पुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत बंद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)