मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांशी चर्चा करणार
By Admin | Updated: October 18, 2014 00:35 IST2014-10-18T00:35:20+5:302014-10-18T00:35:20+5:30
आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले. मुंबईच्या विकासासाठी कार्यरत ‘बॉम्बे फस्र्ट’ या बौध्दिक गटासमोर ते बोलत होते.

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांशी चर्चा करणार
मुंबई : मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि समस्यांच्या सोडवणूकीसाठी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले. मुंबईच्या विकासासाठी कार्यरत ‘बॉम्बे फस्र्ट’ या बौध्दिक गटासमोर ते बोलत होते.
यावेळी या गटाने महानगरापुढील आगामी चाळीस वर्षातील समस्या व आव्हानांवर एक विस्तृत सादरीकरण केले. सन 2क्52 साली मुंबई महानगरातील पायाभुत सुविधांची स्थिती काय असेल याचा विचार करुन मुंबईच्या विकासासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेणो आवश्यक आहे, याबद्ल हे सादरीकरण होते.
शासनाच्या एकूण 17 संस्था मुंबईच्या विकासाठी कार्यरत आहेत. मात्र यात कोणताही ताळमेळ व सुसूत्रता नाही, असे मत या गटाचे अध्यक्ष एन. नायर यांनी म्हटले. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यिासाठी या संस्थामध्ये सुसूत्रता आणणो आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठीया, निवृत सनदी अधिकारी बी. सी. खटुआ, उपाध्यक्ष रॉजर परेरा, व्ही.एस्. पालेकर आणि मुख्य कायर्कारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)