Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कायदा स्वतः च्या हातात घेणे चुकीचेच"; न्यायालयाकडून चौघांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:45 IST

सत्र न्यायालयाकडून चौघांना अटकपूर्व जामीन 

रविंद्र नाईक

मुंबई : दुकानाचा गाळा बळकावला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. हा जामीन अर्ज मंजूर करतानाच अर्जदारांनी न्यायालयात दाद न मागताच परस्पर कायदा स्वतःच्या हातात घेणे चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवले

डोंगरी येथील सॅम्युअल स्ट्रीट येथील दुकानाचा गाळा बळकावल्याच्या आरोपावरून हनिफ कुरेशी (६२), शादाब कुरेशी (३५), सलीम कुरेशी, शाकिर कुरेशी या चौघांविरुद्ध सख्ख्या भावाने डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गाळ्याला असलेले कुलूप तोडून तक्रारदार आणि अर्जदार यांनी त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होऊ नये यासाठी चौघा अर्जदारांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायाधीश एस डी तवशीकर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

टॅग्स :मुंबईन्यायालय