मुंबई : शिधापत्रिकाधारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारे धान्य त्याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात ठरावीक कालावधीपर्यंत घेण्याची मुभा होती. आता ही मुभा रद्द करण्यात आली असून, त्या त्या महिन्यातच रेशन घेणे अनिवार्य आहे अन्यथा रेशन मिळणार नाही.
दुसऱ्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंतची मुभा रद्द- कार्डधारकांना विविध कारणांनी आपले रेशन त्याच महिन्यात घेणे शक्य होत नाही. - अशावेळी पुढील महिन्याच्या ७ तारखेपर्यंत कार्डधारकांना रेशन घेण्याची मुभा होती. - आता ही मुभा रद्द केली आहे. त्यामुळे रेशन घेण्यास विसरून पुढील महिन्याची ७ तारीख गृहीत धरून शिल्लक धान्य घेण्यासाठी दुकानात गेल्यास धान्य मिळणार नाही, असा शासन निर्णय जारी झाला आहे.
जिल्ह्यात १७ लाख ९४ हजार रेशन कार्डधारक - मुंबईत अंत्योदय शिधापत्रिकाधारक १५,४४१- प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारक १७,०३,९०६- एपीएल शिधापत्रिकाधारक ७५,४८७
शिल्लक धान्यांचा प्रश्नही निकाली- ही मुभा रद्द केली आहे. रेशन दुकानातून वितरण होणाऱ्या धान्याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित शिधावाटप नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने केले आहे.- या शिल्लक धान्यांची आकडेमोड करताना होणारा भ्रष्टाचार या निर्णयामुळे रोखू शकतो.