मुंबई : कांदिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईदरम्यान जमावाने पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दरम्यान, परिसरातील सर्व अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कांदिवली येथील लोखंडवाला सर्कल परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या आर दक्षिण विभागाकडून शनिवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना जमावाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तसेच, संयंत्रे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पाहणीदरम्यान, रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने, पदपथांवर निर्माण झालेले अडथळे हे गगराणी यांनी प्रत्यक्ष उभे राहून निष्कासित करायला लावले. तसेच, डिलिव्हरीच्या दुचाकी उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पिझ्झा दुकानाला बंद करण्याच्या सूचना दिल्या.
नियमानुसार कारवाई करून सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ला करणे हे निंदनीय असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. हल्ला करणाऱ्या जमावात अनधिकृत फेरीवाल्यांसोबत काही स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Web Summary : Commissioner Gagrani ordered strict action against illegal hawkers after an attack on municipal staff in Kandivali. He visited the site, addressed traffic obstructions, and instructed action against involved students and errant businesses. The administration condemns attacks on officials performing their duty.
Web Summary : कमिश्नर गगरानी ने कांदिवली में नगरपालिका कर्मचारियों पर हमले के बाद अवैध फेरीवालों पर सख्त कार्रवाई का आदेश दिया। उन्होंने घटनास्थल का दौरा किया, यातायात बाधाओं को दूर किया, और शामिल छात्रों और गलत व्यवसायों के खिलाफ कार्रवाई करने का निर्देश दिया। प्रशासन ड्यूटी पर अधिकारियों पर हमलों की निंदा करता है।