Join us  

रेल्वे फेरपरीक्षा घ्या; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 4:00 AM

मुंबई सेंट्रल येथे आंदोलन : मराठी तरुणांना डावलण्याचा निषेध

मुंबई : स्थानिक मराठी तरुणांना डावलून रेल्वे भरती परीक्षेत उत्तर भारतीय तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती होत असल्याचा कट सध्या रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यामुळे पुण्यातील २०० हून अधिक तरुणांच्या पुनर्परीक्षेची तारीख तातडीने जाहीर न केल्यास, भविष्यात होणाऱ्या परिणामांना रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा खासदार अनिल देसाई यांनी मुंबईतील रेल्वे बोर्डातील अधिकाºयांना शुक्रवारी दिला.

रेल्वेतील ‘ग्रुप डी’मधील भरतीमध्ये २०० हून अधिक मराठी परीक्षार्थींना डावलण्याचा गंभीर प्रकार पुण्यातील नºहे परीक्षा केंद्रावर घडला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समितीने शुक्रवारी मुंबई सेंट्रल येथील रेल्वे बोर्डाच्या कार्यालयात आंदोलन केले. आंदोलनात खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. ‘मुजोर रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा धिक्कार असो’, ‘आधी रोजगार स्थानिकांना मग परप्रातीयांना’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.सणासुदीच्या काळात परीक्षेच्या वेळा निश्चित केल्याकित्येक महिन्यांपासून रेल्वेमध्ये लाखोंच्या संख्येत असलेली रिक्तपदे भरण्यासाठीच्या प्रक्रियेला रेल्वे बोर्डाने सुरुवात केली. ऐन सणा-सुदीच्या काळात रेल्वे बोर्डाकडून मराठी तरुणांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या. राज्यात सुरू असलेल्या रेल्वे भरती प्रक्रियेत मराठी तरुणांना डावलून जागा रिक्त ठेवायची आणि रिक्त जागेवर काही महिन्यानंतर परप्रांतीयांची वर्णी लावायची, असा कट सध्या रेल्वे भरतीमध्ये सुरू आहे. संपूर्ण प्रक्रियेत भूमिपूत्रांना डावलून परप्रांतीयांना रोजगार दिल्यास, भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस अनिल देसाई यांनी सांगितले.अधिकारी व्यस्तरेल्वे भरती बोर्डाचे अध्यक्ष सी. गोपाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ‘मी व्यस्त असून कोणालाही भेट घेण्यासाठी सोडू नये,’ अशा सूचना केल्याची माहिती मिळाली़

टॅग्स :मुंबईरेल्वेरेल्वेभरती