डीम्ड कन्व्हेयन्स कायद्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:27+5:302021-01-13T04:11:27+5:30
गृहनिर्माण संस्थांना रमेश प्रभू यांचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य शासनाने जारी केलेल्या ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ कायद्याचा अधिकाधिक ...

डीम्ड कन्व्हेयन्स कायद्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा
गृहनिर्माण संस्थांना रमेश प्रभू यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाने जारी केलेल्या ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ कायद्याचा अधिकाधिक गृहनिर्माण संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महासेवाचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी केले. दहिसरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दिशा फाऊंडेशन व महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनमार्फत दहिसर स्पोर्टस् फाउंडेशन, समाज कल्याण, येथे डीम्ड कन्व्हेयन्स विशेष मोहीम यावर संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभू यांनी सरकारने लागू केलेल्या डीम्ड कन्व्हेयन्स कायद्याच्या गृहनिर्माण संस्थांना होणाऱ्या फायद्याबाबत मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात इमारतींची पुनर्बांधणी करताना सोसायटीच्या सदस्यांकडे डीम्ड कन्व्हेयन्स असणे गरजेचे आहे. तहान लागल्यावर विहीर खणण्याऐवजी नागरिकांनी आताच डीम्ड कन्व्हेयन्स सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात १४० गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, अॅड अजित मांजरेकर आणि डॉ. उमेश वरळीकर उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारच्या ‘डीम्ड कन्व्हेयन्स-स्पेशल ड्राइव्ह’विषयी माहिती असलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले.